जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची प्रतिक्षा सुची प्रसिध्द

जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची प्रतिक्षा सुची प्रसिध्द

 

भंडारा, दि. 13 : जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी, कुटूंबातील पात्र सदस्यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याकरिता जिल्हा परिषद भंडारा या कार्यालयास अर्ज करून नोंदणी रजिष्टरवर नोंदणी केलेली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करुन यादी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी bhandara.gov.in व bhandarazp.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच एक प्रत जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.

 

सबंधित अनुकंपा उमेदवारांनी यादी तपासुन घेवून माहितीत दुरुस्ती करणे व काही आक्षेप असल्यास सबळ पुराव्यासह लेखी अर्ज उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद भंडारा यांचे नांवाने दिनांक 3 मे 2023 पर्यंत करावा. त्यानुसार आवश्यक ती सुधारणा व कार्यवाही करण्यात येईल. विहीत मुदतीत कोणत्याही प्रकारचे आक्षेप प्राप्त न झाल्यास ही यादी अंतिम करण्यात येईल व याबाबत कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. याची सबंधीत उमेदवारानी नोंद घ्यावी. असे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी कळविले आहे.