मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण -2024 कार्यक्रम घोषित

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण -2024 कार्यक्रम घोषित

गडचिरोली, दि.27: भारत निवडणूक आयोगाच्या दि.29 मे 2023 च्या पत्रान्वये दि.01.01.2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. या कार्यालयाच्या संदर्भाधीन पत्रान्वये सदर कार्यक्रम आपणास कळविण्यात आला होता. त्यानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक 05 जानेवारी 2024 असा होता. मात्र मोठया प्रमाणात PSEs/DSEs अद्याप निकाली काढावयाची शिल्लक असल्याने तसेच फॉर्म Pendency सुद्धा असल्याने अंतिम याद्या प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याची विनंती या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगास केली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दि. 26.12.2023 च्या पत्रान्वये मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमात पुढील प्रमाणे सुधारणा केल्या आहेत.
दावे व हरकते निकाली काढण्याचा सध्याचा दिनांक 26.12.2023 (मंगळवार) पर्यंत सुधारित कालावधी दिनांक 12 जानेवारी 2024 (शुक्रवार), मतदार यादीचे Health Parameter तपासणी आणि अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे. डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे दिनांक 01 जानेवारी 2024 (सोमवार) पर्यंत होता. आता सुधारित दिनांक 17 जानेवारी 2024 (बुधवार) राहील. अंतिम प्रसिद्धी दि.05 जानेवारी 2024 (शुक्रवार), याचा सुधारित दिनांक 22 जानेवारी 2024 (सोमवार) राहील.
भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त वाढीव कालावधी प्रलंबित असलेले फॉर्मस निकाली काढणे तसेच सर्व DSEs /PSEs अंतिमरित्या निकालात काढणे, याकरीता दिलेला आहे. सबब दि. 05 जानेवारी 2024 या दिनांकापर्यंत प्राप्त झालेले सर्व फॉर्मस (फॉर्मस क्र.6,7, व 8) तसेच DSEs /PSEs निकालात काढावयाचे आहेत. दि.12 जानेवारी 2024 रोजी रात्री 11.59 वाजता ERoNet-2 सर्व कार्यवाहीकरिता बंद करण्यात येणार असल्याने दि. 05 जानेवारी 2024 पर्यंत प्राप्त झालेले / डिजीटाईज झालेले BLO assigned करण्यात आलेले अर्जच अंतिम कार्यवाहीसाठी विचारात घेण्यात यावेत. नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर या पुनरिक्षण कार्यक्रमात कार्यवाही करता येणार नाही, यांची नोंद घ्यावी.
आयोगाने अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यांनतर कोणतीही वगळणी शक्यतो करु नये, अशा सूचना दिलेल्या असल्याने सर्व दुबार मतदारांची वगळणी दि.12 जानेवारी 2024 पुर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.