मुंबई चे शोध पथकासह सायबर पोलीसांनी जिल्हयातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद…

सायबर जागृती यात्रा च्या माध्यमातून जनजागृती

एच. आर. कॉलेज मुंबई चे शोध पथकासह सायबर पोलीसांनी जिल्हयातील विविध ठिकाणातील ३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद…

विदर्भातील शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनी / तरुण वर्गामध्ये सायबर गुन्हयांच्या बाबत जागृती स्तराची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, गृह विभाग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली “सायबर जागृती यात्रा” चे मुख्य संशोधक डॉ. नविन मुकेश पंजाबी, सहाय्यक प्राध्यापक आणि स्थानांतर संरचनेने निर्देशक, एच. आर. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि अर्थशास्त्र, मुंबई यांचे अध्यक्षतेमध्ये सायबर जागृती यात्रेचे आयोजन केले असुन सदर पथक संशोधन व जागरुकता उपक्रमातंर्गत लघु संशोधन प्रकल्पाकरीता माहिती संकलीत करण्यासाठी मणिभवन गांधी संग्रहालय मुंबई येथुन दिनांक ७ फेब्रुवारीला “सायबर जागृती यात्रा” ची सुरुवात करुन वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा अशा ११ जिल्हयांना भेट देवुन दिनांक १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी समारोप करणार आहे.

दिनांक ०९/०२/२०२४ रोजी ‘सायबर जागृती यात्रा” चे मुख्य संशोधक आपल्या संशोधक विद्यार्थ्यांचे पथकसह चंद्रपूर येथे आल्याने पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु याचे मार्गदर्शनात सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांचे नेतृत्वात पोउपनि श्री रोशन इरपाचे, पोलीस अंमलदार मुजावर अली यांचे सह मुख्य संशोधक डॉ. नविन मुकेश पंजाबी यांची टिम चंद्रपूर शहरातील सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, जनता महाविद्यालय चंद्रपूर आणि श्री ज्ञानेश विद्यालय तथा महाविद्यालय नवरगांव ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर याठिकाणी जावुन शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व त्यास प्रतिबंध करण्याच्या उपाय योजना संदर्भात संवाद साधुन विद्यार्थ्यांकडुन सद्य:स्थितीत त्यांच्या सायबर ज्ञानाबाबत माहिती घेवुन प्रश्नोत्तर संदर्भाने माहिती विचारुन विद्यार्थ्यांना मोबाईल तंत्रज्ञानाचा जपुन वापर करणे, आर्थीक फसवणुक झाल्यास सायबर हेल्प लाईन 1930 वर डॉयल करणे, सायबर गुन्हयांसाठी cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल हरविल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन रिपोर्ट करण्याबाबत माहिती देवुन सायबर गुन्हयापासुन

सुरक्षिततेचे उपाय योजना बाबत जनजागृती करण्यात आली. सदर “सायबर जागृती यात्रा” चे मुख्य संशोधक डॉ. नविन पंजाबी सह त्यांचे पथकातील संशोधक विद्यार्थी संजना चुघ, समन्वय सहगल, रेणुका राव, क्षितिज शर्मा, गर्व नेनवानी यांना चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे सोबत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य श्री प्रमोद काटकर, प्राध्यापक डॉ. एस. बी. किशोर प्रा. निशाात शास्त्राकार व इतर प्राध्यापक वर्ग तसेच जनता महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. एम. सुभाष व इतर प्राध्यापक व रजिस्ट्ररार तसेच श्री ज्ञानेश विद्यालय तथा महाविद्यालय नवरगांव ता. सिंदेवाही येथील प्राचार्य डॉ. सुरेश एस. बाकरे, प्राध्यापक डॉ. गजानन कोरलवार व इतर प्राध्यापक वर्ग यांनी सहकार्य केले. तर नमुद तिन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात सदर जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.