महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा धोकेबाज सरकारवर हल्लाबोल

लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही

विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांची टीका

नागपूर, १२

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, सरकारी सेवेत कर्मचारी भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्ला बोल मोर्च्यात केला.

नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ‘ हल्ला बोल ‘ मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्च्यात बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नसल्याची टीका केली. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र वेळीच मदत करत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावले.

नागपूर इथे झालेल्या मोर्च्यात व्यासपीठावर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, सुनील केदार, माणिकराव ठाकरे , वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, तुम्ही तीन राज्य जिंकले असाल पण आज या मोर्चातील उपस्थिती तुम्हाला महाराष्ट्रातून हाकलून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे सरकार तीन तीघडा काम बिघाड आहे. पहिले अलिबाबा चाळीस चोर होते आता दोन अलिबाबा ८० चोर आहेत आणि ते महाराष्ट्र लुटायला निघाले म्हणून आज हल्लाबोल आम्ही करत आहोत. राज्यात बळीराजा प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधान सभेतून पळ काढता येणार नाही असं म्हणत वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर शेतकरी ,शेतमजूर या सरकारला धडा शिकवेल,नियमित कर्ज भरणाऱयांना आम्ही दिलासा दिला पण हे ट्रिपल इंजिन सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहेत,त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे.

थापाड्या सरकारनं ७५ हजार भरती करण्याची घोषणा केली त्याचे काय झाले असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. शिक्षक भरती नाही,तरुणाच्या हाताला काम नाही,महाराष्ट्रातील कोणताही घटक सुखी नाही. या सरकारमध्ये भांडण सुरू आहे. राज्यातील मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवावे म्हणून दोन समाजात भांडण लावण्याचं काम करीत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली .