मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

गडचिरोली दि.16 : मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. यानुसार 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली व अहेरी या विधानसभा मतदार संघात 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता तर ब्रम्हपुरी व चिमुर या विधानसभा मतदार संघात सायंकाळी 6 वाजतानंतर प्रचारास बंदी राहील.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांतून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. मतदारांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.