शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20,2020-21, 2021-22

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20,2020-21, 2021-22

गडचिरोली, दि.13: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत “शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार”, “उत्कृष्ट क्रीडामार्गदर्शक्‍ पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)”, “शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)” असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. शिछप-2020/प्र.क्र.93/क्रीयुसे-2, दि. 14 डिसेंबर, 2022 मधील नियम क्र. 4 व नियम क्र. 5 (3) नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकुण गुणांकनासह संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरील “पुरस्कार (Award)” टॅब मध्ये दि. 13 ते 15 एप्रिल, 2023 या कालावधीपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला आहे.

प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यात नमूद केलेल्या माहिती संदर्भांत आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि. 13 ते 15 एप्रिल, 2023 या कालावधीपर्यंत संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.inया ई-मेल आयडीवर विहित नमुन्यात कळविण्यात याव्यात, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. विहित नमुना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरील “ताज्या बातम्या (Latest News)” मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या आक्षेप / हरकतींचे निराकरण / स्पष्टीकरण दि.15 ते 17 एप्रिल, 2023 या कालावधीत संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरील “पुरसकार (Award)” टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल हे देत आहे.

टिप :- संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा अहवाल हा प्राथमिक छाननी अहवाल असून, तो अंतिम नाही.