chandrapur I ग्रामपंचायत लाडबोरी तर्फे शिवस्वराज्य दिन साजरा

ग्रामपंचायत लाडबोरी तर्फे शिवस्वराज्य दिन साजरा

✍️ सुनिल गेडाम

लाडबोरी : महाराष्ट्र शासन यांच्या ग्राम विकास विभाग कडून संपूर्ण महाराष्ट्रात ६ जून ला शासकीय कार्यालयात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे शासन परिपत्रक निघाले . त्या अनुसंघाने आज ग्रामपंचायत लाडबोरी वतीने शिव स्वराज्यराज्य दिन कोविड १९ च्या नियमावली नुसार साजरा करण्यात आला. शासन परिपत्रक च्या नियमावली नुसार संपूर्ण पालन करीत स्वराज गुढी उभारली व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून या कार्यक्रमांची सांगता केली. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत लाडबोरी मधील सरपंच ममता चहांदे, उपसरपंच मंगेश दडमल, सदस्य कमलाकर कामडी, सुरेश नान्नवरे, बेबीनंदा नागदेवते व ग्रामपंचायत मधील कर्मचारी वर्ग व गावातील नागरिक उपस्थित होते .