गडचिरोली : शिवसेनेच्या पदाधिकारी व मंत्र्यावर जाहीररीत्या टीका करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टीची पक्ष प्रमुखाकडे मागणी

शिवसेनेच्या पदाधिकारी व मंत्र्यावर जाहीररीत्या टीका करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टीची पक्ष प्रमुखाकडे मागणी

बातमी संकलन – पंकज चहांदे

आरमोरी-मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी असूनही शिवसेनेच्या मंत्र्यावर व पदाधिकाऱ्यांवर जाहीररीत्या टीका करणे सुरू केले आहे, त्यात स्वयंघोषित संघटक आरमोरीचे राजु अंबानी, व माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी हे जाहीररीत्या काँग्रेस व राष्ट्रवादी च्या पत्रकार परिषदेत सन्माननीय कर्तव्यदक्ष पालकमंत्री एकनाथजी शिंदे हे संघटनेकडे लक्ष नाही, कामे करीत नाही अशी टीका केली होती, त्यावेळेस माजी आमदार रामकृष्ण मडावी हे सर्किट हाऊस च्या बाजूच्या रूम मध्ये होते, त्या नंतर आरमोरी येथेही काही पदाधिकाऱ्यांनी मीटिंग आहे असे सांगून बोलविले व मीटिंग संपल्यानंतर एक पत्रक काढून पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचेवर टीका केली नंतर दुसरा जिल्हाप्रमुख दया अशीही मागणी केली, त्यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे एक मंत्री आरमोरी येथे आले असता भाऊ तुम्हीच पालकमंत्री व्हा अशी जाहीर चर्चा केली.
या वरून हे ज्या पक्षनेत्याच्या नेतृत्वाखाली कामे करतात त्यांच्यावरच जर जाहीररीत्या टीका करीत असतील तर त्यांना पक्षात एक मिनिट ही राहण्याचा अधिकार नाही.
मा. पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबानी जिल्ह्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कामे केली, पूरग्रस्तांना जीवणावस्यक किट वाटपाचा कार्यक्रम केला, गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट स्थापित केले, जे रेमडेसीविर इंजेक्शन कुठंही भेटत नव्हते ते आपल्या जिल्ह्यातील गरीब जनतेला उपलब्ध करून दिले,अनेक विकासाची कामे मंजूर केली, जाभळासारखे फळ जे आपल्या जिल्ह्यात कोरची भागात मुबलक प्रमाणात पिकते त्याला राज्यस्तरावर बाजारपेठ मिळवून दिली. महाविकास आघाडी चे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पालकमंत्री यांच्या कामांवर खुश असताना आपल्याच पक्षाचे स्वयंघोषित संघटक राजू अंबानी व माजी आमदार रामकृष्ण मडावी हे टीका करीत आहेत. हे पक्षविरोधी कृत्य असल्याने यांना तात्काळ पक्षातून हकालपट्टीसाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे, माजी विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर, गडचिरोली संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्याकडे लेखी तक्रार केली असून लवकरच स्वतः मुंबई ला जाऊन साहेबांची व सर्व नेत्यांची भेट घेणार असल्याचे कळविले आहे.
या नंतर आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्ष नेत्यावरची जाहीर टीका सहन केली जाणार नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी कळविले आहे.