सोयाबीन खरेदीची नोंदणी कालावधी 15 ऑक्टोबरपासून

सोयाबीन खरेदीची नोंदणी कालावधी 15 ऑक्टोबरपासून

चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : नाफेडच्या वतीने आधारभूत दराने हंगाम 2021-22 मध्ये सोयाबीनच्या खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सोयाबीन खरेदीकरीता नोंदणी कालावधी दि. 15 ऑक्टोबर 2021 पासून निश्चित करण्यात आला आहे.
राज्य शासनाने खरेदीची तारीख अद्याप निश्चित केली नसून सदर माहिती प्राप्त होताच याबाबत कळविण्यात येणार आहे. खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू होणार असून ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नाही, अशा तालुक्यांना जोडण्यात आले आहे. यामध्ये वरोरा खरेदी केंद्राला वरोरा-भद्रावती, चिमूर खरेदी केंद्राला ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड, गडचांदूर खरेदी केंद्राला कोरपणा, जिवती व चंद्रपुर तर राजुरा खरेदी केंद्राला बल्लारपूर, गोंडपिपरी व  चंद्रपुर या तालुक्यांना जोडण्यात आले आहे.
दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण कागदपत्रासह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.