chandrapur I रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याचठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देवू नयेत..

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रते-

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याचठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देवू नयेत –

फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ०७.०० वा ते रात्री ०८.०० वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात. प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर साथरोग संपूर्ण संपेपर्यंत बंद ठेवणेची कार्यवाही करावी. ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत १५ दिवस असेल. सदर नियम १० एप्रिल, २०२१ पासून लागू होईल. स्थानिक प्रशासनाने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड -१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील, ते दंडनीय कारवाई पात्र राहतील. जर विक्रते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असलेची स्थानिक प्रशासनाची खात्री झालेस व सदर विक्रते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांचेवर निलंबनाची किंवा साथरोग आटोक्यात येई पर्यंत बंद ठेवणेची कारवाई करणेत येईल