chandrapur I ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

‘ब्रेकद चेन’ अंतर्गतजिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

चंद्रपूर दि.5 एप्रिल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेशीत केले आहे.

संचारबंदी : चंद्रपूर जिल्हयामध्ये कलम १४४ लागू करणेत आला आहे. यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यत, ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध असेल. सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० ते सकाळी ७.०० पर्यंत आणि शुक्रवार रात्री ८.०० ते सोमवार सकाळी ७.०० वाजेर्पत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास किंवा खालील नमुद कारणास्तव दिलेल्या परवानगीशिवाय फिरता किंवा वावरता येणार नाही.