सिंदेवाही | टेकरी येथे ओपन ग्रीन जिमचे लोकार्पण

सिंदेवाही | टेकरी येथे ओपन ग्रीन जिमचे लोकार्पण

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोज गुरुवारला माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुड सर आणि क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा तालुका क्रीडा संयोजक धंनजय मोगरे सर आणि अगळे सर मुख्याध्यापक इंदिरा गांधी विद्यालय टेकरी यांच्या पाठपुराव्यामुळे इंदिरा गांधी विद्यालय टेकरी येथे ओपन ग्रीन जिम मंजूर करण्यात आली , त्याचे उदघाट्न प्रेमकुमार हरणे सचिव ज्ञान संवर्धन संस्था मोहाली यांच्या हस्ते पर पडले यावेळी अध्यक्ष म्हणून अगळे सर मुख्याध्यापक टेकरी, प्रमुख पाहुणे म्हणून मोगरे सर तालुका क्रीडा संयोजक, विजय नैताम उपसरपंच टेकरी, भूपेश लाखे कोशाध्यक्ष ज्ञान संवर्धन संस्था मोहाडी, देवेंद्र मंडलवार अध्यक्ष तंटा मुक्ती टेकरी, यशवन्त सूर्यवंशी माजी सरपंच तसेच शाळेतील तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मांडवकर सर आणि आभार प्रदर्शन सिंधी मेश्राम यांनी केले