आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाद्वारे रुग्णांना तात्काळ उपचार

आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाद्वारे रुग्णांना तात्काळ उपचार

गडचिरोली,दि.20 : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी आरोग्य विभागामार्फत मतदान केंद्र निहाय आरोग्य सेवेचे नियोजन केले होते. जिल्हा नियंत्रण कक्षामधुन जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रताप शिंदे व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी सनियंत्रण करीत होते. मागील कित्येक दिवसापासुन विविध स्तरावरुन मा मु का अ यांचे व्दारे वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सीएचओ, मानसेवी वै अ, औषधनिर्माण अधिकारी यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
पोलिस पथक, मतदान कर्मचारी, अधिकारी असो वा रांगेत उभा राहणारा मतदार आज मग कुणालाही त्रास झाला तेव्हा जिल्हा नियंत्रण कक्ष व तालुका नियंत्रण कक्ष यांचे समन्वयाने तालुकास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथक, प्रा आ केंद्र स्तरावरील शिघ्र प्रतिसाद पथक यांचे व्दारे रुग्णांना त्वरीत आरोग्य सेवा देण्यात आल्या. यामध्ये उच्चरक्तदाब, गंभीर जलशुष्कता, मधुमेह, बेशुध्दपणा अशा रुग्णांना त्वरीत शिघ्र पथकाने आवश्यक औषधोपचार दिले व आवश्यकतेनुसार तात्काळ रुग्णवाहिकाने संदर्भित केले.
निवडणुकीच्या दिवशी संपुर्ण जिल्हयात किरकोळ आजाराच्या २०० रुग्णांना किरकोळ उपचार करण्यात आले, तसेच गंभीर आजाराच्या ३० रुग्णांना तात्काळ प्राथमिक आरोग्य उपचार करुन जिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले. त्यापैकी ५ रुग्णांना अत्यावश्यक सेवा देवुन सा. रू. गडचिरोली व उपजिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करुन प्राण वाचवण्यात आले. भरती करण्यात आलेल्या रुग्णांपैकी उच्चरक्तदाब ६ व मधुमेह ७ यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे मतदारांना व मतदान यंत्रणेला मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्यास मदत झाली. तसेच अहेरी येथील मतपेटया संकलन केन्द्रावर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.