उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

चंद्रपूरदि. 18 : उपप्रादेशिक  परिवहन  कार्यालयातर्फे  चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात  येत  आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत.  तरीजिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन  उपप्रादेशिक  परिवहन  अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे : दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी आनंद निकेतन महाविद्यालयआनंदवन वरोरा26 ऑक्टोबर रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी27 ऑक्टोबर रोजी रोजी शरद पवार महाविद्यालयगडचांदूर30 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर आणि 31 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह,गोंडपिपरी या ठिकाणी  शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक महिन्याला दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी.