कर्जमाफी योजनेच्या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

कर्जमाफी योजनेच्या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

भंडारा, दि. 20: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ऑनलाईन रित्या सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यात प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळालेले शंभराहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मा. मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन झाले. या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. पी. कांबळे यांच्यासह शंभर वरून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.