पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न,

पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न,

65 उमेदवारांची प्राथमिक निवड 

         भंडारा, दि.6 :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा आणि मनोहर भाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर (MIET) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन मनोहर भाई पटेल अभियांत्रीकी महाविद्याल यशहापूर  (MIET) या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेले होते.

            या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडाराचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, मनोहर भाई पटेल अभियांत्रीकी महाविद्याल यशहापूरचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे, डॉ. शाहीद शेख कार्यक्रम समन्वयक तथा विभाग प्रमुख सिव्हील, प्रा. अजय मोतीवाल मॅकेनिकल विभाग प्रमुख, प्रा .जयंत राजूकर ट्रेनिंगप्ले समेंट अधिकारीउपस्थितहोते.

         यावेळी मार्गदर्शन सुधाकर झळके सहायक आयुक्त यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेवून आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करावे. खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणावर असून त्यामधून सुरुवात करावी असे मार्ग दर्शन केले. डॉ.प्रल्हाद हरडे, प्राचार्य मनोहर भाई पटेल अभियांत्रीकी महाविद्याल यशहापूर यांनी आजचे युग हे कौशल्याचे युग असून ज्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांना रोजगार हमखास मिळेल व त्यासाठी मनोहर भाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर हे उमेदवारांना नेहमीच विविध संधी उपलब्ध करुन देत असते.

            तसेच कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमासाठी महाविद्यालयाचे नेहमीच सहकार्य लाभेल असे मार्गदर्शन केले.सदर रोजगार मेळाव्या मध्ये स्थानिक जिल्हयातील तसेच जिल्हया बाहेरील नामाकिंत 9 कंपन्यानी त्यांच्या कडील 200 पेक्षा जास्त पदासाठी मुलाखती घेतल्या व याच दिवशी 65  उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्या मध्ये प्रत्यक्ष 369 उमेदवार उपस्थित होते. श्री. सुहास बोंदरे, जिल्हा समन्वयक, अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांनी स्वंयरोजगारा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हयातील विविध महामंडळाच्या स्टॉलला 85 उमेदवारांनी भेट देवून स्वयं रोजगार विषयक माहिती घेतली. 170 विद्यार्थ्यां नोकरी  विषयक मार्ग दर्शनाचा लाभ घेतला.

या रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्र संचलन रिया खन्ना यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. जयंत राजूरकर यांनी केले .जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्ग दर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील  सुधाकर झळके सहायक आयुक्त यांचे मार्ग दर्शना खाली भाऊराव निंबार्तेक. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सोनु उके जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श. क.सय्यद वरिष्ठ लिपीक, श्रीमती.आशा लता वालदे वरिष्ठ लिपीक, प्रियामा कोडे वरिष्ठ लिपीक, सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, आय.जी. माटूरकर शिपाई व मनोहर भाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक विद्यार्थी  व  विद्यार्थींनी तसेच एनएसएसचे स्वयंसेवक यांनी अथक परि श्रम घेतले.