बालकांना दिली बाल संरक्षण विषय कायद्यांची जाणीव

बालकांना दिली बाल संरक्षण विषय कायद्यांची जाणीव

गडचिरोली, दि.15: जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली तर्फे दिनांक 12 जानेवारी 2024 ला राजे धर्मराव हायस्कूल मुलचेरा येथील बालकांना बाल संरक्षण विषय कायद्यांची माहिती दिली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी बालकांचे अधिकार, ग्राम बाल संरक्षण समितीची रचना व  बालकांचे विविध कायदे,  बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बाल कामगार अधिनियम, बालविवाह, पोक्सो ऍक्ट, दत्तक विधान प्रक्रिया, चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक 1098 तसेच बालंकाबाबत काम करणाऱ्या यंत्रणा, याबाबत बालकांना मार्गदर्शक केले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अनव्ये मुलीची वय 18 व मुलाचे 21 वर्ष पूर्ण  झाल्याशिवाय विवाह करणार नाही अशी शपथ राजे धर्मराव हायस्कूल मुलचेरा येथील शिक्षण घेणाऱ्या बालकांना दिली.
सदर उपक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या मार्गदर्शाखाली घेण्यात आले. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक दिलीप रॉय, सहायक शिक्षक उमेश मंथनवार, जिजाबाई गोऱ्होकार, प्रज्ञा गोंगले, राजेंद्र लाकडे, उत्तम गहाने उपस्थित होते.