सिंदेवाही तालुक्यात कृषी विभागाकडून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्व्हे

सिंदेवाही तालुक्यात कृषी विभागाकडून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्व्हे

कुकडहेटी येथे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केली शेतावर जावून पाहणी

सिंदेवाही :- जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून यामुळे धानाचे पीक पूर्णतः सडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक वाया गेले. याबाबत शासनाकडे नुकसान भरपाई बाबत मागणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने सिंदेवाही तालुक्यात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनाच सर्व्हे सुरू असून तालुक्यातील कुकडहेटी येथे कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष शेतावर जावून पिकाची पाहणी करण्यात आली.
सिदेवाही तालुका हा मुख्यत्वे धानाचे पीक घेणारा तालुका असून यावर्षी धानाचे पीक चांगले असताना ऐन कापणी करण्याच्या हंगामात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातात येणारे पीक वाया गेल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून पीक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सिंदेवाही तालुक्यात नुकताच कृषी विभाग मार्फत शेतावर जावून सर्व्हे सुरू केला असून गुरुवारी तालुक्यातील कुकडहेटी येथे कृषी विभागाच्या उपविभागीय अधिकारी अर्चना फुलसुंदर यांचे उपस्थितीत सिंदेवाही तालुका कृषी ए.आर.महाले, पेटगावचे कृषी सहाय्यक एन.के. शिंदे , पीक विमा सर्वेअर महेश जांबुळे, शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली.