कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम 7 फेब्रुवारी रोजी रन फॉर लेप्रसी

कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम 7 फेब्रुवारी रोजी रन फॉर लेप्रसी

         भंडारा,दि.5 : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी  व जागतिक कुष्ठरोग निवारण दिनांचे औचित्य साधुन संपुण भारतात भारतदेश कुष्ठरोग मुक्त करणे हा संकल्प साध्य

 करणे करिता व कुष्ठरोगबाबतची जनजागृती ग्रामीण व शहरी भागातील तळागळा पर्यत पोहचविणे करिता स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवाडा अंतर्गत विविध जनजागृती चे कार्यक्रम संपुर्ण जिल्हयात आयोजित करण्यात आलेले आहेत.

          कुष्ठरोग इतर सर्वसामान्य आजारा प्रमाने असल्याने लवकर निदान व नियमित उपचाराने कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो.हा संदेश समाजात देणे करिता स्पर्श अभियानाच्या अनुषंगाने लाला बहादुर शास्त्री विद्यालय भंडारा येथील प्राचार्य श्रीमती.चोले यांच्या सहकार्याने 30 जानेवारी,2024 रोजी रॅली काढण्यात आली.

          तसेच प्रकाश विद्यालय कारधा येथे प्राचार्य श्रीमती.कुलकर्णी व संबंधित शाळेतील सहाय्यक शिक्षकांच्या सहकार्याने निंबधस्पर्धा घेऊन भंडारा डॉ.सीमा यादव,एन.एम.एस.श्री. निखाडे व सोनवणे,एन.एस.ए.पडोळे,कुष्ठरोग तंत्रज्ञ भुरे व पी.एम.डब्लु कुमारी खंदारे यांच्या प्रयत्नामुळे वरिल कार्यक्रम यशस्वी झाले.

     कुष्ठरोग्णाबाबत समाजात भेदभाव न होता.सन्मानाने जगण्या करिता समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे.यासाठी 7 फेब्रुवारी,2024 रोजी सकाळी 7.30 वाजता माधव नगर रेल्वे मैदान खात रोड,पुरुष व महिला गटास प्रत्येकी प्रथम पारितोषिक 4 हजार रुपये,द्वितीय पारितोषिक 2500 रुपये,तृतीय पारितोषिक 1500 रुपये ठेवण्यात आली आहे.

     नोंदणीसाठी 5 व 6 फेब्रुवारी,2024 तसेच नोंदणीसाठी संपर्क क्रमांक श्री.योगेश खोब्रागडे,9326915209 व श्री.लक्ष्मन सोनवाने, 9890377820 जिल्हा आरोग्य प्रशासन,भंडारा व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांच्या संयुक्त विद्यमानाने करु या  व वयोगट 15 ते पुढे करिता खुली मॅराथॉन आयोजित करण्यात आलेली ओ.या मध्ये सहभाग घेऊन कुष्ठमुक्त भंडारा या ध्येयात सामील व्हावे.असे सहाय्यक संचालक आरोग्य-सेवा कुष्ठरोग भंडारा विभागाने कळविले आहे.