नागरिकांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्षात 24  नोव्हेंबरपर्यत  पुरावे सादर करावे

नागरिकांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्षात 24  नोव्हेंबरपर्यत  पुरावे सादर करावे

             भंडारा, दि. 17 :मराठा,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा,कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी शासनाव्दारे  मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच, शासन निर्णयान्वये या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे

          त्यानुषंगाने, जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे समितीस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात दि. 21.11.2023ते दि.24.11.2023 या कालावधीत  सादर करावीत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असुन उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांची नियुकती या कामासाठी करण्यात आली आहे.तरी नागरिकांनी कुणबी असल्याबाबतचे वर नमुद पुरावे या कक्षात21 ते  24 नोव्हेंबरपर्यत सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.