जिल्हा परिषद भंडारा पदभरती निकाल -2023

जिल्हा परिषद भंडारा पदभरती निकाल -2023

         भंडारा, दि.5: जिल्हा  परीषद अंतर्गत गट-क च्या (वाहन चालक व परिचर वगळून) 19 संवर्गाची रिक्त पदे भरण्यासंबंधाने दिनांक 05/08/2023 ला जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. IBPS कंपनीकडून आज दिनांक पर्यंत एकुण 31 संवर्गापैकी 25 संवर्गाची ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेली आहे.  त्यामध्ये जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जाहिरात देण्यात आलेल्या 19 संवर्गापैकी 14 संवर्गाची ऑनलाईन परिक्षा पुर्ण झालेली आहे.  जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जाहीरातीमध्ये समाविष्ठ असलेल्या व ऑनलाईन परिक्षा पुर्ण झालेल्या सदर 14 संवर्गापैकी खालील 4 संवर्गाचे ऑनलाईन परिक्षेचे निकाल IBPS कंपनीकडून या जिल्हा परिषदेस प्राप्त झालेले असून सदर निकाल जिल्हा परिषद भंडाराच्या अधिकृत www.bhandarazp.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

अ.क्र.

संवर्गाचे नांव

संकेतस्थळावर परिक्षेचे निकाल प्रसिध्द केल्याचा दिनांक

1.

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

18/01/2024

2.

विस्तार अधिकारी (सांख्यीकी)

20/01/2024

3.

विस्तार अधिकारी (कृषी)

20/01/2024

4.

आरोग्य पर्यंवेक्षक

20/01/2024

                        अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी भंडारा यांचे निर्देशानुसार निकाल प्राप्त झालेल्या उपरोक्त संवर्गामधील प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे पात्र उमेदवारांचे दस्ताऐवज पडताळणीकरिता दिनांक 16/02/2024 ला दुपारी 02.00 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हा निवड समितीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.   शासन निर्णय दिनांक 04 मे 2022 मधील तरतुदीनुसार 1 पदाकरिता  गुणानुक्रमे 3 या प्रमाणात पात्र उमेदवारांना बोलावण्यात येत आहे.

                         उपरोक्त सभेमध्ये दस्ताऐवज पडताळणीकरिता उपस्थीत राहण्यास्तव गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना लेखी पत्र त्यांचे आवेदन पत्रातील पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर (Speed Post व्दारे)  तसेच संबंधीत उमेदवाराचे ई-मेल आयडीवर पाठविण्यात आलेले आहे.  पत्राव्दारे उमेदवारांना आवश्यक सर्व दस्ताऐवजांच्या मुळ प्रति व प्रत्येकी 1 छायांकित प्रतिसह नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थीत राहण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. करिता उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www.bhandarazp.org या अधिकृत संकेत स्थळावर वेळोवेळी भेट देऊन आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन घ्यावी.

असे,

                                                                                                       सदस्य/सचिव

                                                                                              जिल्हा निवड समिती तथा                                      उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)                     जिल्हा परिषद, भंडारा यांनी कळवले आहे.