जिल्हयातील पेट्रोल व गॅस सिंलेडर, डिझेल पुरवठयाच्या दृष्ट्रीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा

जिल्हयातील पेट्रोल व गॅस सिंलेडर, डिझेल पुरवठयाच्या दृष्ट्रीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा

           भंडारा दि.2 :  जिल्ह्यातील  पेट्रोल व गॅस सिंलेडर, डिझेल पुरवठयाच्या दृष्ट्रीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी आज आयोसिएल,बीपीसीएल,एचपीसीएल व भंडारा जिल्हा पेट्रोल असोसिएशन व एलपीजी फेडरेशन ,भंडारा या संघटनांच्या प्रतिनींधीशी ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला  जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी,अधिक्षक श्री.डोंगरे  उपस्थित होते.

        या बैठकीमध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस डिलर असोशिएशनला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,असे बैठकीत जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी सांगितले.इतर जिल्हयांच्या प्रशासनाच्या सोबत आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली.