नगरपरिषदांच्या निवडणूक प्रारूप प्रभाग  रचनेबाबत हरकती व सूचना आमंत्रित

नगरपरिषदांच्या निवडणूक प्रारूप प्रभाग

 रचनेबाबत हरकती व सूचना आमंत्रित

भंडारा, दि. 9 : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगरपरिषदांच्या निवडणूक प्रभागांच्या प्रारूप रचनेसाठी हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत हरकती व सूचना संबंधित नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळवले आहे.