पीक विमा योजनेला  मुदतवाढ  3 ऑगस्टपर्यंत शेतक-यांनी एक रूपयात  विमा योजनेचा लाभ घ्यावा  -जिल्हाधिकारी

पीक विमा योजनेला  मुदतवाढ  3 ऑगस्टपर्यंत शेतक-यांनी एक रूपयात  विमा योजनेचा लाभ घ्यावा  -जिल्हाधिकारी

           भंडारा, दि.31 जुलै : खरीप  हंगामातील  प्रधानमंत्री  पीकविमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. परंतु काही तांत्रीक अडचणींमुळे शेतक-यांना पीक विमा योजनेचे अर्ज करण्यात अडचणी करण्यात येत होत्या. त्या विचारात घेता ही मुदत 3ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे  .

       अदयाप ज्या शेतक-यांनी या योजनेज अर्ज केले नाही त्यांनी वाढीव  पिक विमा योजनेच्या मुदतीचा लाभ घेऊन अर्ज करण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.जिल्हयातील दोन लाखाहून अधिक शेतक-यांनी या योजनेत अर्ज केले आहेत.तर साधारण 40 हजार शेतक-यांचे अर्ज अदयाप बाकी असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे.

         फक्त 1 रु. प्रति अर्ज करुन विमा काढण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै होती मात्र आता ती वाढून 3 ऑगस्ट अशी करण्यात आली  आहे. संबंधित विमा कंपनी, बँक तथा कृषि विभागाचे अधिकारी यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  यांनी सांगितले.

        पिक विमा योजनेचे अर्ज भरण्यात काही तांत्रिक अडचणी  आल्याने राज्य शासनाने केंद्र शासनाला या योजनेची मुदत वाढून मिळण्याची विनंती केली होती .त्यानुसार आता तीन दिवसाची मुदतवाढ मिळवली असून आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचे अर्ज भरले नाही .त्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेच्या संबंधित कागदपत्र तातडीने भरून या वाढलेल्या मुदतीत विहित पद्धतीने अर्ज भरून घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.