“ पोलीस रेझींग डे निमीत्त स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन “

“ पोलीस रेझींग डे निमीत्त स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन “

भंडारा – दिनांक ०२/०१/२०२४ रोजी पोलीस मिटींग हॉल भंडारा येथे पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, ‘पोलीस रेझींग डे’ सप्ताहनिमीत्त भटक्या विमुक्त जाती जमातीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्री. शिदोधन आंबेगाने उपस्थित भटक्या विमुक्त जाती जमाती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती मधील खेळाडू अविनाश शिंदे, शिवानी शिंदे, मुकेश बोकडे या खेळाडूचा या कार्यकमा दरम्यान सत्कार करण्यात आला. तसेच भटक्या बांधवासाठी उत्कृष्ट कार्य करणारे भटके विमुक्त कल्याणकारी संयोजक शिवाजी कांबळे, व जिल्हा सहयोजक श्री. सोनकुसरे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिचोंळकर स्थागुशा भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत पाटील ठाणेदार वरठी, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदार, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.