जादुटोणा विराधी कायदा अशासकीय सदस्याकरिता अर्ज आमंत्रित

जादुटोणा विराधी कायदा अशासकीय सदस्याकरिता अर्ज आमंत्रित

          भंडारा,दि.2 :जिल्हास्तरीय जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यसाठी अशासकीय  सदस्यांकरीता सहायक आयुक्त,समाजकल्याणकडुन अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.

 यासाठी अर्जदार भंडारा जिल्हयातील रहिवासी असावा,तसेच वय किमान 25 वर्षे असावे,व अर्जदाराने अर्ज करतांना  पोलिस विभागाकडून स्वच्छ चारित्र पडताळणी प्रमाणपत्र अर्जाची संलग्नीत करावे,किंवा किमान 15 दिवसात कार्यालयास स्वच्छ चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची हमी द्यावी असे यासाठीचे निकष असल्याचे विभागाने कळवले आहे.

        तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ठ,अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समुळे उच्चाटन करण्याबाबत अधिनियम-2013 ची जिल्हास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर शासकीय जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय शासकीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.

           अशासकीय सदस्यांची निवड आयुक्त,समाजकल्याण यांच्या मान्यतेने करण्यात येईल.तरी या समितीतील एकुण 7 अशासकीय सदस्य त्यात किमान 2 महिला सदस्यांची नियुक्तीकरीत या क्षेत्रातील अनुभव असलेल्या व इच्छुकांनी सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा या कार्यालयात तसेच acswobhandata@gmail.com या ईमेल वर दि.9 जानेवारी 2024पर्यत अर्ज सादर करण्याचे विभागाने कळवले आहे.