रोजगार मेळाव्यात 38 उमेदवारांनी दिल्या मुलाखती

रोजगार मेळाव्यात 38 उमेदवारांनी दिल्या मुलाखती

         भंडारा,दि.29 : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे काल,भंडारा यांचेमार्फत काल 28 डिंसेबर,2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला.त्यात 38 उमेदवारांनी मुलाखती दिल्यात.

          या रोजगार मेळाव्यात भंडारा येथील त्रिनेत्र पदूम कृषी व ग्रामीण बहूउददेशीय शिक्षण संस्था भंडारा आणि सनसूर सृष्टी इंडिया प्रा.लि.कंपनी भंडारा या नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.त्यांचेमार्फत एकूण 35 जागेकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मेळाव्यात एकूण 38 उमेदवारांची उपस्थिती दर्शविली होती.त्यामध्ये 32 उमेदवारांनी प्रत्यक्ष,6 उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती.त्यामधून 38 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

          रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमतीमनिषा कुरसंगे,जिल्हा माहिती अधिकारी,श्रीमतीशैलजा वाघ-दांदळे,तसेच सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार विभागाचे सुधाकर झळके, कौशल्य विकास रोजगार व उद्याजकता मार्गदर्शन अधिकारी भाऊराव निंबाते,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

         तसेच या कार्यक्रमात त्रिनेत्र पदूम कृषी व ग्रामीण बहूउददेशीय शिक्षण संस्था भंडारा या कंपनीकडून श्री.सागर तेलतुंबडे आणि सनसूर सृष्टी इंडिया प्रा.लि.कंपनी भंडारा या कंपनीकडून श्रीमती अलका गीरीपुंजे हे प्रतिनिधी उपस्थित होते.

          सहायक आयुक्त,सुधाकर झळके,यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यामध्ये त्यांनी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यालयामार्फत ऑफलाईन प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केले असल्याचे सांगीतले.उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असून त्यांचेमार्फतही सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात.

          उमेदवारांनी सुरुवातील कमी मानधन न पाहता मेहनतीने यशांची उंच शिखरे गाठावीत,याबाबत उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंत,प्रमुख अतिथी जिल्हा माहिती अधिकार,श्रीमती.शैलजा वाघ-दांदळे,यांनी उमेदवारांनी आवश्यक कौशल्य आत्मसात करुन यश संपादन करावे याबाबत मार्गदर्शन केले.

            तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाऊराव निंबार्ते,यांनी कंपन्यामध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.कार्यालयामार्फत त्यांची माहिती उमेदवारांना देण्याते येते.उमेदवारांचे समूपदेशन कार्यालयामार्फत करण्याते येते.याबाबत उपस्थितांना  माहिती दिली.

         या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श.क.सय्यद,यांनी मानले.हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा कार्यालयातील सहायक आयुक्त,सुधाकर झळके,यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी,भाऊराव निबार्ते,जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके,सय्यद, श्रीमती, आशालता वालदे,श्रीमती.प्रिया माकाडे,सुहास बोंदरे,आय.जी.माटूरकर यांनी  अथक परीश्रम घेतले.