खेलो इंडिया अंतर्गत तलवारबाजी निवड चाचणी

खेलो इंडिया अंतर्गत तलवारबाजी निवड चाचणी

भंडारा,दि.24:- क्रीडा मंत्रालय केंद्र शासनातर्फे खेलो इंडिया सेंटर अंतर्गत भंडारा जिल्ह्यामध्ये तलवारबाजी या क्रीडा प्रकाराचे केंद्र मंजूर झालेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडाराच्या वतीने जिल्हास्तरीय खेळाडू निवड चाचणी 27 व 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित केलेली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळेतील खेळाडू सहभागी होण्याच्या दृष्टीने 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे व सदर निवड चाचणीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.