स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित Ø 21 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित Ø 21 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 18 जुलै : आदिवासी उमेदवारांसाठी वर्ग 3 व 4 पदाकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दि. 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2022 साडेतीन महिने कालावधीचे सत्र दि. 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 1000 इतके विद्यावेतन देय राहील. या प्रशिक्षण कालावधीत अटीची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. 21 जुलै 2022 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 19 येथे सादर करावेत. अर्जामध्ये स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्र. जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचा नोंदणी क्रमांक आदी

बाबींचा उल्लेख करावा व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच अर्ज करण्याकरीता उमेदवाराकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता दि. 27 जुलै 2022 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. तरी, उमेदवारांनी दि. 21 जुलै 2022 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावे आणि नियोजित दिनांकास मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.

प्रशिक्षणाच्या अटी : उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचे नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.

तरी, जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.