राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पधेत पहिल्या दिवशी धावपटूंचा थरार !

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पधेत पहिल्या दिवशी धावपटूंचा थरार !

चंद्रपूर दि.28 : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे काल उद्घाटन झाल्यानंतर आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजेपासूनच मुलींच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेपासून विविध खेळांची सुरूवात झाली. प्रथम फेरीसाठी रंगलेल्या लढतील मुली व मुलांच्या 1500 मीटर,  400 मीटर व 100 मीटर, 100 मीटर अडथळ्याची शर्यत व 4X100 रिले या धावण्याची स्पर्धा झाल्या. तसेच 100 मीटर व 400 मीटर उपांत्य फेरीचीही लढत झाली यात विद्यार्थ्यांनी पूर्ण ताकदीनिशी धावल्याने प्रेक्षकांना धावपटूंचा थरार अनुभवास मिळाला.

 यासोबतच आज अ-गटाच्या व ब- गटाच्या पात्रता फेरीसाठी थाळी फेक, उंच उडी, गोळा फेक, तिहेरी उडी, हतोडा फेक या स्पर्धेतही खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले.