संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना अभिवादन

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना अभिवादन

भंडारा दि. 19 : संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ येथे आज संत शिरोमणी रोहिदास महाराज पुण्यतिथी निमीत्त अभिवादन करण्यात आले.

            यावेळी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ दिलीप तांडेकर, नगर सेवक कैलास तांडेकर, सामाजिक कार्यकर्ते रोहीत बरेकर, राकेश तांडेकर सहसचिव, सदस्य संत रोहीदास पंचकमेटी मंदीर शैलेस खरोले, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्ग व वित आणि विकास महामंडळ अनिल अस्वार उपस्थित होते.

दिलीप तांडेकर व कैलास तांडेकर यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून संत रोहीदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर व सामाजिक कार्यावर त्यांनी उपस्थितांना  मन चंगा तो कठौती में गंगा ही रचना सादर केली.तसेच रविदास यांच्या  साहित्यीक  कार्यावर प्रकाश टाकला.