जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम

जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम

भंडारा,दि.28: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी विकास नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमांतर्गत दर सोमवारी 52 आठवडे या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यूट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या या ऑनलाईन व्याख्यानमालेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच इतर व्यावसायिक शिक्षणाची आवड, जिज्ञासा, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत नागपूरचे सिव्हील डिपार्टमेंट आणि व्हीएनआटीचे डिन प्रा. डॉ. दिलीप लटये, सी. एस. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी देवरी संगणक विभाग प्रमुख प्रिती नेताम व एन. के. यू. इंजिनिअरींग ॲण्ड कन्सल्टसी सर्व्हिस नाशिक चे नंदकिशोर ऊईके यांचे मार्गदर्शन होणार आहे. ही व्याख्यानमाला 30 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता https://youtu.be/07VS6byJy1U या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन भंडाराचे एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केली आहे.