तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

चंद्रपूर,दि. 28 : चालू हंगामात बाजारभावाने तूर खरेदीकरीता नाफेडमार्फत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी चंद्रपूर खरेदी केंद्रांला पोंभुर्णा, सावली हे तालुके जोडले आहेत. तसेच राजुरा खरेदी केंद्रास बल्लारपूर, गोंडपिपरी व मुल, चिमूर खरेदी केंद्रास ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड, गडचांदूर खरेदी केंद्रास कोरपणा व जिवती आणि वरोरा खरेदी केंद्राला भद्रावती तालुका जोडण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी चंद्रपूर, राजुरा, चिमूर, गडचांदूर आणि वरोरा या खरेदी केंद्रावर ई-सात-बारा, बँक खाते पासबुक आधार कार्ड व आठ-अ प्रमाणपत्र सादर करून तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस.तिवाडे यांनी केले आहे.