आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा जिल्हा दौरा

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा जिल्हा दौरा

         भंडारा, दि. 7: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे दि. 8 डिसेंबर 2023 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वाजता शहापूर येथील डिफेन्स सर्व्हीसेस ॲकेडमी येथे आगमन करतील व सकाळी 11 वाजता राज्याचे राज्यपाल रमेश बैस महोदयांसमवेत विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

दुपारी 12.45 वाजता डिफेन्स सर्व्हीसेस ॲकेडमी येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील व दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता भंडारा येथुन नागपूरकडे प्रयाण करतील.