अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगट व विद्यार्थ्यांकरीता विविध योजना Ø 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगट

व विद्यार्थ्यांकरीता विविध योजना

Ø 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिमुर अंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये  केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेमध्ये अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला-पुरुष बचत गट तसेच विद्यार्थ्यांकरीता विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार योजनानिहाय पात्र उमेदवाराकडून दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

तरी, पात्र ईच्छुक अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावेत. विहित कालावधीमध्ये अर्ज सादर न केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. आवेदन अर्ज कार्यालयात उपलब्ध असून कोणत्याही बाहेर व्यक्तीकडून अर्ज घेऊ नये, अर्जाची झेरॉक्स प्रत चालणार नाही. असे अर्ज आढळल्यास रद्द करण्यात येईल व त्यासाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. सदर योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केलेल्या अर्जदारांनी नवीन अर्ज सादर करावे. योजनांच्या अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी केले आहे.