मनपातर्फे पथनाट्य, झिंगल, शॉर्ट फिल्म, ड्रॉईंग स्पर्धा

मनपातर्फे पथनाट्य, झिंगल, शॉर्ट फिल्म, ड्रॉईंग स्पर्धा

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर । केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत 2022 अभियान, माझी वसुंधरा २.०, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय पातळीवर स्वच्छतेवर पथनाट्य, झिंगल,  शॉर्ट फिल्म अश्या स्वरूपाच्या स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आल्या. दरम्यान, बाबुपेठ येथील मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेत स्वच्छतेवर पथनाट्य सादर करण्यात आले.

महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या स्पर्धकांना गटनिहाय पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. पथनाट्य आणि शॉर्ट फिल्म विडिओ व झिंगलची ऑडीओ मागविण्यात आल्या होत्या.आलेल्या प्रवेशिकांतून पथनाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून बेस्ट टीम निवडल्या गेल्या. त्या टीमचे सादरीकरण विविध वॉर्डमध्ये सादरीकरण करण्यात आले.