गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली, दि.04: पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचे पत्रान्वये अशी बाब निदर्शनास आली आहे की, सुरजागड परिसरात जिल्हा प्रशासनाकडून मोबाईल टॉवर, पुल, रस्ते इत्यादी कामे सुरू आहेत त्यामुळे नागरीकांना दमकोंडा पहाडीवर उत्खनन सुरू होणार असे वाटत आहे. आणि दमकोडा पहाडीवरील उत्खननास परिसरातील नागरीकांनी विरोध करून मौजा-तोडगट्टा, ता. एटापल्ली, जिल्हा-गडचिरोली येथे दिनांक ११/०३/२०२३ रोजी पासुन आंदोलन करून विरोध दर्शविलेला आहे. दिनांक २०/११/२०२३ रोजी वांगेतुरी येथे पोलीस स्टेशन स्थापन करण्यासाठी गट्टा (जा.) येथील पोलीस पार्टी व सी-६० पथक, नक्षल विरोधी अभियानासाठी जात होते तेव्हा त्यांना अडवून, धक्काबुक्की केली व पुढे जावू दिले नाही. म्हणुन, सरकारी कामात अडथळा केल्यावरून पोलीस स्टेशन एटापल्ली येथे अप.क्र. ७४/२०२३ कलम ३५३, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), १८६ व ५०६ भां.दं.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून एकुण २१ नागरीकांना ताव्यात घेण्यात आले असुन सध्या आरोपी न्यायालयीन काठडीत आहेत. आरोपी जामीनावर सुटून आल्यास पुन्हा आंदोलन करण्याची शक्यता पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली यांनी वर्तविलेली आहे.

दिनांक २०/११/२०२३ रोजी मौजा वांगतुरी येथे पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले असुन सदर पोलीस स्टेशनला मौजा वांगेतुरी गावातील व परिसरातील नागरीकांचे समर्थन आहे. परंतु त्याच परिसरातील नक्षल समर्थक व असामाजीक तत्वाच्या लोकांचे प्रखर विरोध होत असुन येत्या काळात मौजा वांगेतुरी गावातील व परिसरातील नागरीकांना समोर करून नक्षलवादी व नक्षल समर्थक यांचेकडून मोठया स्वरूपात आंदोलने करण्याची शक्यता असल्याबाबत गोपनीय सुत्रांकडून खात्रीशिर माहिती मिळालेली आहे. त्यासाठी सदर पोलीस स्टेशनला विरोध म्हणून मौजा वांगेतुरी अथवा नजिकच्या परीसरात कोणत्याही ठिकानी आंदोलन सुरू करू शकतात त्यामुळे सदर ठिकानी कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षीततेच्या दुष्टीकोणातुन सदर परिसरात शांततामय वातावरण राखणे अत्यंत आवश्यक आहे तसेच दिनांक ०२/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ रोजी पासुन नक्षल सप्ताह सुरू होत असुन सदर सप्ताह दरम्यान आपले अस्तीत्व दाखविण्यासाठी नक्षलवाद्यांकडून शासकिय व खाजगी मालमत्तेचे जाळपोळ, नुकसान, शासकिय नौकरदारांवर व नागरीकांवर हल्ले यासारखे कृत्य करून शासकिय कामत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. करिता सदर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदावसुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने दिनांक ४/१२/२०२३ रोजी पर्यत अमलात असलेले प्रतिबंधात्मक आदेश दिनांक १८/१२/२०२३ पर्यत १५ दिवस मुदतीकरीता,सदर परिसरात लागु होण्यास मुदतवाढ मिळण्यास विनंती केलेली आहे.

त्याअर्थी, जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, यांना प्राप्त असलेल्या अधिकारा अंतर्गत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे१४४ अंतर्गत संपुर्ण एटापल्ली तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने व शासकिय कामे सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टिने संपुर्ण एटापल्ली तालुक्यात खालील बाबी कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी करीत आहे.
निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाही. शस्त्र/सोटे/तलवारी/भाले/बंदुका/सुरे/लाठया किंवा काठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही. कोणत्याही शासकीय कामात अडथळा निर्माण करता येणार नाही. कायदेशिरपणे नेमलेल्या व्यक्तीस अडथडा, त्रास किंवा क्षती पोहचविण्यास मनाई असेल.

हे आदेश, कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी संपुर्ण एटापल्ली तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी.
सदर आदेशातील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन कारणाऱ्याविरूध्द फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
सदर आदेश, दिनांक ०५/१२/२०२३ चे ००.०१वा. ते दिनांक १८/१२/२०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत अमलात राहील. असे जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.