बिरसा मुंडा खरे भारतीय स्वातंत्र्यवीर होते : शिक्षणतज्ज्ञ प्रा .मेश्राम 

बिरसा मुंडा खरे भारतीय स्वातंत्र्यवीर होते : शिक्षणतज्ज्ञ प्रा .मेश्राम 

————————————-

जिल्हा परिषद शाळेत जयंती साजरी 

 

सिंदेवाही – बिरसा मुंडा खरे भारतीय स्वातंत्रविर असून त्यांनी जुलमी इंग्रजी सत्तेबरोबरच सावकार जमीनदार व ख्रिस्ती धर्मगुरू यांच्या अन्याय शोषणाविरुद्ध क्रांतिकारी लढा उभारीत देशहित जोपासत समाज बांधवानाही स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले ,असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा .भारत मेश्राम केले .

 ते पंचायत समिती अंतर्गत सिंदेवाही केंद्रामधील जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर येथे आयोजित जननायक बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमप्रसंगी बोलत होते .

 

या बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यध्यापक दिलीप मडावी होते .तर अतिथी म्हणून शिक्षण विभागाचे शिक्षणतज्ज्ञ प्रा .भारत मेश्राम उपस्थित होते .

याप्रसंगी अतिथींच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले .

या कार्यक्रमाला शिक्षक ,पालक,विध्यार्थी व शालेय कर्मचारी उपस्थित होते .

————————————-