नक्षल चकमक शोध मोहिमेबाबत…

नक्षल चकमक शोध मोहिमेबाबत

गडचिरोली, दि.04: सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) अंतर्गत मौजा हिकेर जंगल परिसरात दिनांक 01.04.2023 रोजी झालेल्या पोलीस -नक्षल चकमकी दरम्यान एक पुरुष मृतदेह सापडल्याचे जिल्हाधिकारी,गडचिरोली यांच्या आदेशात नमूद आहे. सदर घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तीचे/मृतदेहाचे मृत्युच्या कारणांचा खात्री करणे आवश्यक असल्याने व त्यासोबत मृतकाचे नावतेवाईक यांचे आक्षेप/हरकती अथवा त्यांच्या बाजु मांडण्यास संधी देण्याकरीता सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये दंडाधिकारी चौकशी या न्यायालयात सुरु आहे.
सदर घटनेत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नातेवाई (श्रीमती. सुमळी तना ताती (मृतकाची आई) क्रिष्णकुमार इडम्मा कडती (नातेवाईक) रा. गुमगुडा पो. धर्माराम ता. ऊसुर जि. बिजापूर) यांना सुनावणीस उपस्थित राहण्याकरीता यापुर्वी दोन नोटीस देण्यात आलेले आहेत. परंतु ते उपस्थित झाले नाही. त्यामुळे त्यांना आजच्या तारखेत तीसरी नोटीस देण्यात येत आहे. तरी जाहीर सूचना प्रसिध्दी झाल्यापासून 21 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी सदर नातेवाईक सुनावणीस हजर न झाल्यास त्यांचे काही आक्षेप नाही असे गृहीत धरुन प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांनी कळविले आहे.