इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे अर्ज आंमत्रित

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे अर्ज आंमत्रित

            भंडारा दि.10 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत शासनाद्वारे गुरव व वीरशैव लिंगायत समाजाचा समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापित करण्यात आले आहे. या दोन्ही महामंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ नागपूर जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील गुरव व वीरशैव लिंगायत समाजातील बेरोजगारांनी व होतकरूंनी या घ्यावा, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

           दोन्ही महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, वैयक्तिक थेट कर्ज याजेना, महिला स्वंयसिध्दी कर्ज व्याज परतवाता योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण विकास या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

           अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात येथे संपर्क साधावा .

         वैयक्तिक कर्ज व्याज परतावा गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनांचे उद्देश, स्वरूप व पात्रतेचे निकष याची माहितीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज करावे. तसेच बीज भांडवल व थेट कर्ज योजनेबाबत जिल्हा कार्यालयात संपर्क साधवा.