मुख्य पोस्ट ऑफीस चंद्रपुर मधील चोरीस गेलेल्या बॅट-या काही तासात हस्तगत केल्या.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ने मुख्य पोस्ट ऑफीस चंद्रपुर मधील चोरीस गेलेल्या बॅट-या काही तासात हस्तगत केल्या.

 

दि.०८/०६/२३रोजी फिर्यादी नामे प्रोवंश दिनबंधु सरकार वय ५५ वर्ष प्रभारी डाकपाल प्रधान डाकघर चंद्रपुर यांनी पोस्टे रामनगर येथे लेखी रिपोर्ट दिली की, प्रधान डाकघर चंद्रपुर येथील युपीएस यंत्रणेच्या एकुन ३५ एस. एम. एफ. ४२ ए. एच. बॅट-या एकुन कि. अंदा. १,१८,६५०/- दि. ०३/०६/२३ रोजी दुपारी १२:०० वा. कार्यालयातुन अज्ञात आरोपीने चोरून नेले अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून पोस्टे. रामनगर येथे अप. क्रं. ६०३ / २३ क. ३७९, ३४ भादवीचा गुन्हा नोंद झाला होता.

मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते मुख्य पोस्ट ऑफीस चंद्रपुर येथिल चोरीस गेलेले बॅट-याचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. दि. ०८/०६/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथक यांनी गोपनीय माहिती व्दारे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे कं १ ) शुभम अमर समुद वय २६ वर्ष २) करण मुन्ना समुंद वय २६ वर्ष ३) सनी अनिल किनवरिया वय २७ वर्ष तिन्ही रा. पंचशिल चौक घुटकाला वॉर्ड चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्यांनी झुडपात लपवुन ठेवलेले विविध कंपनीच्या युपीएस यंत्रणेच्या एकुन १९ एस. एम. एफ. ४२ ए. एच. बॅट-या एकुन कि. अंदा. ७२,८१०/- रू चा माल हस्तगत करण्यात आला नमुद आरोपीने सदर बॉट-या हया मुख्य पोस्ट ऑफिस चंद्रपुर येथुन चोरले होते याची कबुली देवुन त्यांचेकडुन अवघ्या काही तासातच सदर गुन्हा उघडकीस केला.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनी जितेन्द्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा संजय आकुलवार ब.नं. २२१५, पो. अं. नितीन रायपुरे ब.नं. २५४९, पो.अं. प्रांजल झिलपे ब.नं. २९४८, पो.अं. गोपाल आतकुलवार / २५७९ यांनी केली.