शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावे

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावे

        भंडारा, दि. 30 : भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती,इमाव,विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तसेच शिष्यवृती योजनेस पात्र असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की,शैक्षणिक सत्र 2023-24 करीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृती,शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजना तसेच राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृती या योजनांचे महाडिबीटी पोर्टलवर नविन नुतनीकरणाचे अर्ज स्विकृती  11 ऑक्टोबर,2023 पासून सुरु झाले आहे.

       तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अंतीम दिनांकाची वाट न बघता शिष्यवृत्ती योजनाचे अर्ज तात्काळ शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भेट देवुन योजनाच्या अटी व शर्तीचे अवलोकन करुन तसेच त्यानुसार आवश्यक दस्ताऐवज अपलोड करुन अर्ज नोंदणी करावी,व अर्जाची प्रत महाविद्यालयास सादर करावी,

      संबंधितांनी योजनेच्या अधिक माहिती करीता संबधीत महाविद्यालयातील समान संधी केंद्राशी संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभागाचे बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.