राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला शुभारंभ

राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला शुभारंभ

विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला सोमवारपासून शुभारंभ झाला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून जवळपास 1600 खेळाडू आणि 700 पालक आले आहेत. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये 100 मी., 200, 400, 800, 1500 आणि 3000 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, उंचउडी, लांबउडी, हॅमर थ्रो, भालाफेक, क्रॉसकंट्री या स्पर्धा होणार आहेत.