विविध क्षेत्रlत अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांचा मिळणार विशेष गौरव पुरस्कार

विविध क्षेत्रlत अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांचा मिळणार विशेष गौरव पुरस्कार

गडचिरोली, दि.06: सन 2022:23 या वर्षासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित असून बैठकीमध्ये सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणाची छाननी करुन विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येणार आहे.
इयता 10 व 12 वी च्या परीक्षेमध्ये 90 % पेक्षा जास्त गुण मिळवून उतीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याना एकरकमी रुपये 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडण्यात यावे.
तसेच पदवी किंवा पदव्युतर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उतीर्ण झालेल्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना एकरकमी 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.
IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.

तसेच राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इ. यांना अशा कार्याबद्दल त्यांचा सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा पुरस्कार, जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या मार्फत प्रदान करण्यात येणार आहे.
तरी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक/विधवांना कळविण्यात येते की, विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी त्यांनी आपले प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक 15 सप्टेंबर, 2023 पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित माजी सैनिक / विधवांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.