स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

भंडारा, दि. 12 : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत 10 नोव्हेंबर 2021 रोजी महर्षी विद्यामंदिर भंडारा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले म्हणाले, ज्याची जन्म नोंद झाली नाही व एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांना न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करून प्रमाणपत्र मिळू शकते. विद्यार्थ्यांनी गरुजनांचा आदर ठेवावा, कायम शिस्त पाळा व ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बालकासंबंधी कायद्यातील तरतुदी व प्रक्रियेबाबतसुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.