ममता मुलीचे वसतिगृहाची मान्यता रद्द

ममता मुलीचे वसतिगृहाची मान्यता रद्द

 

भंडारा, दि. 6: युग प्रवर्तक शिक्षण संस्था (वासेळा) या संस्थेद्वारे संचालित ममता मुलीचे वसतिगृह विद्यानगर या वसतिगृहाची सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून शासनाने मान्यता रद्द केली आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास तसेच कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास संबंधित संस्था तसेच प्रवेश घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक जबाबदार राहतील,असे जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.