सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थान कडून प्रस्ताव आमंत्रित

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थान कडून प्रस्ताव आमंत्रित

भंडारा दि.11: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथील संस्थेत स्वच्छता गुह व परीसरातील साफसफाईची कामे करण्याकरीता एक कंत्राटी सफाईगार कर्मचारी यांची 11 महिनाच्या कालावधी करीता नियुक्ती करावयाची आहे.

भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थानी 17 जुलै 2023 पर्यत आपले अर्ज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच कामाच्या अटी व शर्ती इत्यादीचा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडीयम यांच्या सूचना फलकावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.