चर्मकार समाजाकरिता विविध कर्ज योजना

चर्मकार समाजाकरिता विविध कर्ज योजना

भंडारा दि.11 : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार मोची तसेच इत्यादी यांची आर्थिक शैक्षणिक व समाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळा मार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या व केंद्र, शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. ही योजना राबविण्यात येत असून 4 हजार 800 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आलेले आहे.

एन.एस.एफ.डी.सी.नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेस 1 लाख रुपये, 1 लाख 50 हजार व 2 लाख, चर्मोद्योग 2 लाख, लघुऋण वित्त येाजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 50 हजार या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता 22.21 कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे.

तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी यांच्या मुदती कर्ज योजना अंतर्गत स्मॉल बिझनेस 5 लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 1.40 लाख तसेच नवीन महिला अधिकरिता योजना 5 लाख मंजूर झालेल्या आहेत.

एन.एस.एफ.डी.सी यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये 20 लाख व विदेशामध्ये 30 लाखापर्यत कर्ज मंजूर करण्यात येईल. अधिक माहिती करिता संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या,भंडारा येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी केले आहे.