औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज

 

भंडारा, दि. 20 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन अर्जाची सुरूवात 12 जून ते 11 जुलै 2023 पर्यंत असणार आहे.

 

12 जून ते 11 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्जाची सुरूवात असेच, पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम 19 जून ते 12 जुलै, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्दी 16 जुलै, पहिली प्रवेश फेरी 20 जुलै, प्रहिल्या यादीनुसार प्रवेश 21 जुलै ते 25 जुलै, द्वितीय प्रवेश फेरी 31 जुलै, दुसऱ्या यादीनुसार प्रवेश 1 ते 4 ऑगस्ट, तिसरी प्रवेश फेरी 9 ऑगस्ट, तिसऱ्या यादीनुसार प्रवेश 10 ते 14 ऑगस्ट, चौथी प्रवेश फेरी 20 ऑगस्ट व चौथ्या यादीनुसार प्रवेश 21 ते 24 ऑगस्ट पर्यंत असणार आहे.

 

तरी इच्छूक उमेदवारांनी http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जावून प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावा व नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावून प्रवेश अर्ज निश्चित करावा. अधिक माहितीकरिता गटनिदेशक व्ही.के.कावडे यांच्याशी 9922881337 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. एम. लाकडे यांनी कळविले आहे.