आदिवासी जमातीकरिता कन्यादान योजना

आदिवासी जमातीकरिता कन्यादान योजना

 

भंडारा, दि. 20 : जिल्हयामध्ये 2011 च्या जनगणे नुसार आदिवासी जमातीची लोकसंख्या 88 हजार 886 असून त्यामध्ये विविध जमातीचा समावेश आहे. या जमातीकरिता कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. लग्न समारंभ सोहळा कार्यक्रम निमीत्ताने मोठया प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह सोहळयांना प्रोत्साहन देण्याकरिता सामुहिक विवाह सोहळयात सहभागी होणाऱ्या वधू आणि वर यांना 10 हजार रूपये आर्थिक सहाय्य दिले जाते व सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेस 10 हजार रूपये प्रति सोहळा प्रमाणे दिले जाते.

 

सन 2023-24 या वर्षात कन्यादान योजना राबविण्या करिता नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था यांच्या कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी इच्छूक संस्थांनी वधूवरांची यादी व संपूर्ण दस्ताऐवजसह दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरज मोरे यांनी केले आहे.